माझ्या मनात आता मजलाच शोधते मी
पाहून आरसाही नव नित्य भासते मी
मन खोल खोल साऱ्या स्मृतीत गुंगलेले
क्षण भिर्र कालचेही बोटांत गुंफलेले
वेड्या उनाड वाऱ्या अजुनी खुणावते मी
माझ्या मनात आता मजलाच शोधते मी
आशा उरी उद्याच्या डोळ्यात मांडलेल्या
कलिका गतस्मृतींच्या माळेत गोवलेल्या
त्या उमलुनी मनाच्या गंधात गुंगते मी
माझ्या मनात आता मजलाच शोधते मी
पंखात नांदती हे वारे भरारण्याचे
अन या पिसांत वाहे मृदू स्वर नवगाण्याचे
झेपावता नभाते घरट्यात नांदते मी
माझ्या मनात आता मजलाच शोधते मी
मंगळवार, सप्टेंबर १९, २००६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
६ टिप्पण्या:
अप्रतिम कविता. खूप आवडली.
आशा उरी उद्याच्या डोळ्यात मांडलेल्या
कलिका गतस्मृतींच्या माळेत गोवलेल्या....
क्या बात है! फारच छान
शुभेच्छा.
अगस्ती आपटे
तशा मी कविता करत नाही...म्हणजे नियमित तर नाहीच नाही...
कविता करायला गेलं की कधी सुचत नाहीत..
कधीतरी काहीतरी सुचलं तर कागदावर किंवा संगणकावर उतरवते...
पण नंतर माझ्याच कविता मी वाचत नाही.
कारण त्याचे काव्यमूल्य मला कळत नाही.
तुम्ही म्हणता तर कदाचित असेल.
दुसऱ्याच्या कविता वाचणाऱ्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे!!!!
धन्यवाद...
दुर्गा, "दुसर्यांच्या कविता वाचणार्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे" हे तुझे वाक्य मला फ़ार आवडले. कविता वाचणार्या तमाम लोकांना अर्पण. एरवी कविता करणारे जास्तं आणि वाचणारे किंवा ऎकणारे कमी हेच चित्रं सगळी कडे दिसतं.
blogवरील सर्वच लेख वेगळे आणि चांगले आहेत.
हेमंत_सूरत
Fyi,So Durga in poetic form.Good trying.Seems to be possesed by Short story writer Saniya/Meghna Pethe....Idea of Blog is Good.I like the Photo.u can give Columns name also.Beware poems are injurious to TARGET GOALS.Congrates for lovely Blog. Wishes.
fyi,
kavita samplya ka adlya.diwalit goad khaun khaun kavi kalpana thijalya ka madam?
Durga,
Is this your Poem? Sunder.
I dont read poems generally, as many poets do them in 'Mukta chhanda'. I began reading poems when one of my friend Pradeep Kulkarni showed me his poems, rather Gazals, when we were students of Jounalism in Ranade Institute.
Believe me, Pradeep is a great poet. You may see him in Sakal, as he is sub-editor for Today supplement.
I liked your poem, because it reminded me of poems Pradeep used to show me. Very Good.
Send me more.
Shirish
टिप्पणी पोस्ट करा